Skip to content Skip to footer

Gokhale Kulmandal

कुलमंडळ

गोखले कुलमंडळ

सर्वसामान्य स्थिती असलेल्या व वाढलेल्या घरात नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारखा जागतिक कीर्तीचा महापुरुष कसा निर्माण झाला? कालप्रवाह ओळखून राज्यकर्त्या प्रतिस्पर्धी ख्रिस्ती मिशनऱ्यांना तोंड देण्याकरता ठामपणे उभे राहणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी कसे निर्माण झाले? हे प्रश्न अभ्यास करण्यासारखे आहेत. अशी हजारो व्यक्तिमत्त्वे विविध परिचित/अपरिचित क्षेत्रांमध्ये गोखले घराण्याने घडवली आहेत. आपले राष्ट्र सामर्थ्यवान व्हावे व आपला समाज कोणत्याही परिस्थितीत उत्कर्ष साधणारा व्हावा, ही आपली इच्छा सफल होण्यास हे संकेतस्थळ व यावरील परिपूर्ण माहिती उपयोगी पडेल असा आम्हाला विश्वास आहे.

आपल्या घराण्यामधील पुत्र, आपली कन्या अशा आपल्या पुढच्या पिढीने कर्तृत्व गाजवून आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करावे अशी साऱ्या आई-वडिलांची इच्छा असते. हीच भावना व्यापक स्वरूपामध्ये कुलपरिवाराच्या बाबतीत आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. घराच्या, घराण्याच्या किंवा कुळाच्या अभिमानाने माणसे काही दिव्य आणि भव्य साधण्याच्या मार्गाला लागली, तर ते समाजाला हितकर आणि राष्ट्राचे सर्वांगीण वैभव वाढवणारेच ठरणार आहे.

– गोखले कुल मंडळ, पुणे
रास्ते, पालकर, बडे, कातरणे (या उपनावांसह)
कोजागिरी पौर्णिमा
१६ ऑक्टोबर २०२४

कार्यकारिणी सदस्य

आनंद गोखले

प्रसन्न गोखले

राजाभाऊ गोखले

विवेक गोखले

राहुल गोखले

विनायक शंकर रास्ते

चंद्रशेखर गोखले

मिलिंद गोखले

अविनाश धोंडो गोखले

अनिल गोखले