मैत्र हे शब्द सुरांचे
‘मैत्र हे शब्द सुरांचे’ हा कार्यक्रम दूरदर्शन केंद्र, मुंबई यांच्या प्रस्तुतीतून डीडी सह्याद्री (सह्याद्री मराठी) वाहिनीवर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निर्मात्या उमा दीक्षित असून, निर्माता-दिग्दर्शक उमा दीक्षित आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी विजय गोखले यांच्यासह ओमकार प्रभूघाटे, मयुर सुकाळे, संदीप पवार, निरंजन लेले, कल्याणी जोशी आणि संपदा माने यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विघ्नेश जोशी यांनी केले असून, संकलनाची जबाबदारी रामचंद्र वाडेकर यांनी सांभाळली आहे. शीर्षक गीत दिनेश अडावदकर यांनी लिहिले असून, त्याला संगीत कौशल इनामदार यांनी दिले आहे. हे गीत हंसिका अय्यर आणि धनंजय म्हसकर यांच्या सुमधुर आवाजात सादर झाले आहे. निर्मिती सहाय्यक म्हणून विश्वजीत वळंजू आणि सोशल मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारी सई सागर मांजरेकर यांनी पार पाडली आहे.
गोखले बंगला
आधुनिक भारताचे शिल्पकार नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी १९१० साली पुण्यात स्वतःचे घर बांधले. फर्ग्युसन रस्त्याजवळ ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’कडे जाणाऱ्या मार्गावर ही वास्तू आहे. या घरात मध्यभागी चौक असून त्याभोवती अंगणात उघडणाऱ्या बारा खोल्यांची रचना करण्यात आली आहे. विटा आणि चुना वापरून १५ इंच जाड भिंतींचे सुमारे अडीच हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे हे घर बांधले गेले. आजही ही ऐतिहासिक वास्तू त्यांच्या वंशजांनी जतन करून ठेवली असून ती गोखले यांच्या कार्याची साक्ष देते.
सदर लेख “ग्राहकहित 2022” या अंकामध्ये प्रकाशित झाला होता. ग्राहक पेठेच्या पुर्व परवानगीने या संकेतस्थळावर पुन:प्रकाशित केला आहे.

वारसा