Skip to content Skip to footer

Home

 प्रस्तावना

गोखले कुलमंडळ

आपल्या घराण्याचा पूर्वापार व खरा इतिहास कळल्यास आपल्या पूर्वजांच्या मनोवृत्ती कशा होत्या, त्यांच्या अंगी मुख्यत्वेकरून कोणकोणते गुण होते, त्यांचे शील कसे होते, यांच्या वेळच्या परिस्थितीत व आत्ताच्या परिस्थितीत जो काही फरक झाला असेल तो राष्ट्रहिताच्या दृष्टीने कितपत इष्ट किंवा अनिष्ट आहे याचा तुलनात्मक दृष्टीने विचार करण्यास अशा घराण्यांचे इतिहास बाहेर पडणे अत्यंत जरुरीचे आहे.

– लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

कोकणामधून घाटावर आलेल्या ब्राह्मण घराण्यांमध्ये गोखल्यांइतके विस्ताराने मोठे असलेले दुसरे घराणे नाही. माणसाची कीर्ती व गुणवत्ता त्याच्या अलौकिक गुणांनी ठरते. बुद्धिमत्ता, समाजसेवा व नैतिक अधिष्ठान तसेच एखाद्या कार्याला वाहून घेण्याची वृत्ती या गोष्टी दुर्मिळ आहेत. गोखले घराण्यामधील व्यक्तींनी हे गुण प्रकट करून जागतिक कीर्ती मिळवणाऱ्या व्यक्ती राष्ट्राला बहुसंख्येने पुरवल्या आहेत.

कुलभूषण

नामदार गोपाळ कृष्ण गोखले

गोपाळ कृष्ण गोखले हे आधुनिक भारताचे एक महान नेते, नेमस्त पक्षाचे अध्वर्यू आणि थोर समाजसेवक होते. त्यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी रत्नागिरीतील कातळूक येथे झाला.

अधिक वाचा…

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)

भारतीय हवाई दलात जून १९६८ मध्ये फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त झालेले एअर मार्शल भूषण गोखले यांनी विविध लढाऊ आणि ट्रेनर विमानांवर ३,५०० तासांहून अधिक उड्डाण केले आहे.

अधिक वाचा…

व्यवसाय निर्देशिका

कुलवृत्तांत आणि कुलसंमेलने

कार्यकारिणी सदस्य

आनंद गोखले

प्रसन्न गोखले

राजाभाऊ गोखले

विवेक गोखले